तेऊरवाडीमध्ये रंगणार टिपीएल क्रिकेट स्पर्धा, युवकांचा पुढाकार - चंदगड लाईव्ह न्युज

29 April 2023

तेऊरवाडीमध्ये रंगणार टिपीएल क्रिकेट स्पर्धा, युवकांचा पुढाकार

 


तेऊरवाडी / सी. एल.एन वृत्तसेवा

       'ना पैशासाठी - ना नावासाठी, तीन दिवस फक्त आपल्या गावासाठी' हे ब्रीदवाक्य घेऊन दि. २९ एप्रिल पासून तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे तेऊरवाडी प्रीमिअर लिग (टिपीएल )च्या क्रिकेट स्पर्धाना प्रारंभ होत आहे. गावातीत सर्व युवकांना एकत्र आणण्याच्या या स्तुत्य उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.

        अगदी आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धा होत आहेत. १० संघ मालक आपले संघ या स्पर्धेत उतरवत आहेत. विशेष म्हणजे गावातील सर्व युवक या टिपीएल च्या माध्यमातून वर्षातून किमान तीन दिवस तरी एकत्र यावेत, एकत्र विचारांची देवाण घेवाण व्हावी, युवकामध्ये सुसंवाद घडावा हा मुख्य हेतू या स्पर्धा ठेवण्या मागे आहे. या गावातील अनेक युवक सरकारी नोकरीत आहेत. तर अनेक जन उच्च शिक्षण घेत आहेत. परदेशातही शिक्षणा बरोबर नोकरी करणाऱ्या युवकांची मोठी संख्या आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने हे सर्व युवक गावामध्ये जमले आहेत. खेळाच्या माध्यमातून एकत्र वावरण्याचा आनंद लुटणार आहेत. यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.                 अजिंक्य पाटील व किसन भिंगुडे, गजानन पाटील व ब्रम्हानंद लोहार, सुबराव पाटील, विश्वनाथ पाटील व विलास पाटील, हरिश भिंगुडे व मनोज भिंगुडे, दयानंद पाटील, विश्वनाथ पाटील व जानबा पाटील, शशिकांत सलामवाडकर व नागेश पाटील, सुरज पाटील व संतोष कुंभार, जयसिंग पाटील व प्रमोद पाटील हे संघ मालक आहेत. हुलकाई स्टेडिअमवर होणाऱ्या या टिपिएल स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. एकंदरीत टिपिएलच्या माध्यमातून सर्व युवकांना एकत्र करणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
No comments:

Post a Comment