शाळा कॉलेजमधून संस्कार व शिस्त शिकवण्याची गरज - सह निबंधक अरुण काकडे - चंदगड लाईव्ह न्युज

29 April 2023

शाळा कॉलेजमधून संस्कार व शिस्त शिकवण्याची गरज - सह निबंधक अरुण काकडेचंदगड/प्रतिनिधी 
 वाढती प्रलोभन आणि पाश्चात्त्य पाश्चिमात्य संस्कृतीचे अतिक्रमण याच्यामुळे आजची शाळा कॉलेजची पिढी संस्कारापासून दूर होत चालली असून त्यांना शाळा कॉलेजमधूनच संस्कार आणि शिस्त शिकवण्याची गरज आहे असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे सह निबंधक अरुण काकडे यांनी केले. मजरे कार्वे ता.चंदगड येथील महात्मा फुले विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक  जी.पी. वर्पे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ॲड. एस .आर. पाटील हे होते.प्रारंभी प्रास्ताविक प्राचार्य एम.एम. गावडे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत एम. एम. तुपारे यांनी केले.            सह. निबंधक श्री. काकडे पुढे म्हणाले शिक्षकाने आपल्या कर्माशी ठाम राहून इतर प्रलोभनाला बळी न पडता कार्य करत राहणे महत्त्वाचे आहे .आजच्या मोबाईल युगात युवा पिढी भरकटत चालली असून शाळा कॉलेजमधूनच संस्कार आणि  शिस्त लावण्याचे धडे दिले पाहिजेत . सुखाच्या मागे न जाता आपल्याकर्तव्याशी प्रामाणिक राहून जो जगतो तो आपल्या जीवनात निश्चित यशस्वी होतो. शेअर मार्केटच्या नावाखाली बाजारात आलेल्या फसव्या योजनांना शिक्षकाने बळी न जाता सहकार खात्यातील योजनांना प्रतिसाद द्यावा. वेळ गेल्यानंतर पश्चाताप करून घेऊन मानसिक त्रास घेण्यापलीकडे काही शिल्लक उरत नसते असे ते म्हणाले. सत्कारमूर्ती जी.पी.वरपे यांनी आपल्या  मनोगतातून आपल्या तीस वर्षाच्या भावपूर्ण सेवेच्या कालखंडात आपण कर्तव्याशी एकनिष्ठ राहिल्याने आपण विद्यार्थी वर्गात लोकप्रिय झालो. शालेय जीवनात वर्ग मित्रांशी असलेले सहसंबंध आजपर्यंत मी जोपासले म्हणून माझ्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माझे वर्गमित्र जिल्ह्याचे सह निबंधक अरुण काकडे उपस्थित राहिले असे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात ॲड.एस.आर. पाटील यानी आज चारित्र्यसंपन्न शिक्षक मिळणे खूप कठीण आहे. विद्यार्थ्यांच्यात आदर्श व्यक्तिमत्व म्हणून जी.पी.वर्पे यांची ओळख आहे. सेवानिवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून ते दीपस्तंभासारखे उभे राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली. .यावेळी आर.पी.पाटील,एन एस पाटील,पी.आर.पाटील, सरपंच शिवाजी तुपारे एम.टी.कांबळे,एस.वाय.कुंभार,
राजेंद्र शिवणगेकर, विलास नाईक,जान्हवी पाटील यांनी मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या.यावेळी सरपंच सुजाता यादव,सौ.स्नेहल वर्पे, प्राचार्य पी.आर.पाटील, माजी सरपंच गुंडू सावंत, गजानन ढेरे,राघोबा वर्पे,एम.एस कोले,माजी प्राचार्य एस.व्ही गुरबे,पुन्नाप्पा वर्पे,रामाण्णा पाटील ,शामराव मुरकुटे आदीसह मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता मुरूकुटे व रूपाली वणकुंद्रे यांनी केले तर आभार एस.आर .पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment