निट्टूर येथील नरसिंह मंदिराचे मंगळवार ते गुरुवार कळसारोहन व उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

29 April 2023

निट्टूर येथील नरसिंह मंदिराचे मंगळवार ते गुरुवार कळसारोहन व उद्घाटन
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
निट्टूर (ता. चंदगड) येथील पांडवकालीन, पुरातन नरसिंह (नरसोबा) मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले आहे. या मंदिराचे कळसकारोहण व उद्घाटन कार्यक्रम मंगळवार दि २ मे ते गुरुवार ४ मे अखेर संपन्न होणार आहे.
  धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने चंदगड तालुक्यातील हे महत्त्वाचे ठिकाण आहे. हे मंदिर डोंगरातील गुहेत लेणी सदृश असून ते पांडवकालीन असल्याच्या कथा प्रचलित आहेत. याच पुरातन मंदिराचा ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांच्या मदतीतून जिर्णोध्दार परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.  मंदिराच्या नवीन इमारतीवर कळस बसवण्याबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मंदिर व परिसर नुतनीकरणचे उद्घाटन होणार आहे. दि. २ रोजी सकाळी ९ ते २  कळस मिरवणूक, २ ते ६ महिला हरिपाठ, सायं. ६ ते ८ प्रवचन, रात्री ८ वाजता शिवाजीराव भुकेले यांचे 'ज्ञानदेवांचे पसायदान' विषयावर व्याख्यान नंतर जागर भजन. बुधवार ३ रोजी सकाळी ८ ते १२ यज्ञ व होमहवन, दुपारी १२ ते १ वाजता सच्चिपुत्र दास व आनंद वझे यांच्या उपस्थितीत कळसारोहण, १ वाजता माधव चरणदास यांचे प्रवचन, दुपारी २ ते ६ महिला हरिपाठ, रात्री ८ ते ९ प्रवचन, ९ ते ११ पूर्णानंद काजवे महाराज कोगनोळी, ता. चिकोडी यांचे कीर्तन तर रात्री जागर भजन. गुरुवार दि. ४ रोजी सकाळी ८ ते १० वाजता पुरोहित भगीरथ दास व अचिंत्य कृष्णदास यांच्या उपस्थितीत नरसिंह मूर्तीस अभिषेक व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन नरसिंह देवालय जीर्णोद्धार कमिटी तसेच ग्रामपंचायत निट्टूर, घुल्लेवाडी, म्हाळेवाडी व जकनहट्टी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment