न. भु. पाटील ज्युनि. कॉलेजच्या कु.अदिती हदगलची राष्ट्रीय पातळीवर निवड, रायफल शुटींग क्रीडा प्रकारात चंदगडचे नाव राज्याच्या नकाशात - चंदगड लाईव्ह न्युज

30 April 2023

न. भु. पाटील ज्युनि. कॉलेजच्या कु.अदिती हदगलची राष्ट्रीय पातळीवर निवड, रायफल शुटींग क्रीडा प्रकारात चंदगडचे नाव राज्याच्या नकाशातचंदगड : सी. एल. वृत्तसेवा

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे दिनांक 26 एप्रिल  2023 या कालावधीत  घेण्यात आलेल्या "राज्यस्तरीय रायफल शुटींग क्रीडा स्पर्धेमध्ये ओपन साईट एअर रायफल प्रकारात कु. अदिती नितीन हदगल हिने  सतरा वर्षे वयोगटात सुवर्णपदक प्राप्त केले आहे. ती न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेज चंदगड या कॉलेजची विद्यार्थिनी असून तिची राष्ट्रीय स्पर्धेकरता निवड झाली आहे.

प्राचार्य एन.डी. देवळे यांनी अभिनंदन केले. क्रीडा शिक्षक एन. डी. हदगल, व्ही. टी. पाटील यांचे तीला मार्गदर्शन लाभले.


No comments:

Post a Comment