संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे लघुपट निर्मीती कार्यशाळेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

30 April 2023

संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे लघुपट निर्मीती कार्यशाळेचे आयोजन

 


महागाव / सी. एल. वृत्तसेवा

शिक्षणातील संकल्पना, निसर्गातील गोष्टी, सामाजिक समस्या व सर्व स्तरावरील संशोधन समजेल अशा स्वरूपात मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे विज्ञान, या विषयी लघुपट ही गरज लक्षात घेऊन एस. जी. एम. अभियांत्रिकी तर्फे २७ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत लघुपट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे व तज्ञ मार्गदर्शक म्हणून श्रीनगर येथील प्रसिध्द लघुपट निर्माते जलाल उद् द्दीन बाबा हे उपस्थित होते. ज्यांचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात केला होता. शिवाय त्यांना भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने विषेश कार्याबद्दल गौरविण्यात आले आहे. नुकताच त्यांना विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. सध्या ते नॅशनल जिओग्राफिक संस्थेबरोबर कार्यरत आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यांनी केले. सदर कार्यशाळेमध्ये लघुपट कसा करावा, विषय कसा निवडावा, कोणती उपकरणे वापरावीत, आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्य वापर याची माहिती व प्रात्यशिके दाखवण्यात आली. या कार्यशाळेस पन्नासपेक्षा जास्त फार्मसी, बी. ए. एम म. एस. व अभियांत्रिकी अशा विविध विद्याशाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सदर कार्यशाळेसाठी अतुल गावडे (संचालक फिल्म मेकिंग, कोल्हापूर) हे उपस्थित होते.

या तीन दिवसीय कार्यशाळेसाठी समन्वयक म्हणून प्रा. डी. जे. मोरे, प्रा. सौ. एम. एन. पाटील यांनी काम पाहिले. सुत्रसंचालन प्रा. ए. ए. सुतार व प्रा. एस. बी. पोवार यांनी केले. कार्यशाळेस एस्. जी. एम्. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. आण्णासाहेब चव्हाण, विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण व डॉ. संजय चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.



No comments:

Post a Comment