हलकर्णी महाविद्यालयात रांगोळी प्रदर्शन फनी गेम्स आणि फूड स्टॉल कार्यक्रम संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

30 April 2023

हलकर्णी महाविद्यालयात रांगोळी प्रदर्शन फनी गेम्स आणि फूड स्टॉल कार्यक्रम संपन्न

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथ यशवंतराव चव्हाण पाटील महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात गुरु महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयामध्ये रांगोळीचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी लावलेल्या विविध फूड स्टॉल्स चे उद्घाटन आणि फनी गेम्स चे उद्घाटन  मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
    प्रारंभी दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव विशाल पाटील उपस्थित होते. स्वागत प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांनी केले. यावेळी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या फूड स्टॉल्स चे उद्घाटन विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या रांगोळीचे प्रदर्शन आणि फनी गेम्स चे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील व्यवस्थापक मनोहर होसुरकर, प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, प्रा. पी. ए. पाटील, प्रा. के. एम. गोनुगडे, प्रा. ए. एस. जाधव कार्यालयीन अधीक्षक प्रशांत शेंडे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात  आले.
      फनी गेम्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत करण्यात आला होता. सकाळपासून महाविद्यालय आवाराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी फूड स्टॉल फनी गेम्स आणि रांगोळी कमिटीचे प्रमुख व त्यांचे सदस्य तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर दिनांक २९ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांच्या गुणगौरवासाठी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

No comments:

Post a Comment