लेडिज सिंघम राजश्री पचंडी याना आदर्श तलाठी पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

01 May 2023

लेडिज सिंघम राजश्री पचंडी याना आदर्श तलाठी पुरस्कार

जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर तलाठी सौ. राजश्री पचंडी यांचा पुरस्कार देवून सन्मान करताना
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
       कोल्हापूर जिल्ह्यात अतिक्रमण हटाव 
मोहिमेबरोबरच महसूल विभागातील  उत्कृष्ठ कार्याबद्दल ज्यांची लेडीज सिंघम म्हणून ओळख आहे. अशा कोवाड - तेऊरवाडी गावच्या तलाठी सौ. राजश्री पचंडी यांना उत्कृष्ठ तलाठी पुरस्कार देवून जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी सन्मानित केले.
  महाराष्ट्र दिनानिमित्य कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार सौ. पचंडी यांना प्रदान करण्यात आला.  यावेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे, शासनाच्या विविध विभागाचे अधि काही उपस्थित होते. तलाठी सौ. पचंडी  यांचा पाणंद रस्ते खुले करणे, अतिक्रम काढणे यामध्ये हातखंडा आहे. तसेच प्रत्यक्ष प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई -पिक नोंदणीचा उपक्रम तर वाखाणण्याजोगा होता. कोरोणा लॉकडाऊन काळात तर कार्वे -पाटणे फाटा विभागात तर प्रचंड मोठा दबदबा निर्माण केला होता. रस्त्यावरून व घराबाहेर फिरणाऱ्यांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांच्या प्रशासनातील बेधडक व पारदर्शी कामामुळे लेडी सिंघम म्हणून त्या चंदगड गडहिंग्लज विभागात परिचित आहेत. दोन दिवसापूर्वी तेऊरवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार राजेश पाटील व माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यानी सौ. पचंडी यांच्या कार्याचा मोठा गौरव केला होता. लगेचच त्यांना हा पुरस्कार जाहिर झाल्याने चंदगड तालूक्यात त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment