मुलाला वाचवताना शेततळ्यात पडून वडिलाचा मृत्यु, आमरोळी येथील घटना - चंदगड लाईव्ह न्युज

29 April 2023

मुलाला वाचवताना शेततळ्यात पडून वडिलाचा मृत्यु, आमरोळी येथील घटना

 


चंदगड / सी.एल. वृत्तसेवा

चंदगड-गडहिंग्लज राजमार्गावर आमरोळी  (ता. चंदगड) नजिक  शेततळ्यात बुडून गडहिंग्लज येथील शब्बीर रजाक हेब्बाळे (वय ४० वर्ष रा. नदीवेस गडहिंग्लज) या मंडप डेकोरेटरचा मृत्यू झाला. तर त्याचा मुलगा सुफियान मात्र सुदैवाने बचावला.

शब्बीर हेब्बाळे हे आपल्या कुटुंबासह गडहिंग्लजहून चंदगड तालुक्यातील एका गावात लग्न समारंभात फूल डेकोरेटरेशनच्या कामासाठी आले होते. काम आवरुन पुन्हा गडहिंग्लजला जात असताना वाटेत लागणाऱ्या आमरोळी-पोरेवाडी येथील शेत तळ्याजवळ सावलीत दुपारचे जेवण करत होते. जेवण झाल्यानंतर मुलगा सुफियान ताट धुण्यासाठी तळ्यात उतरताना  पाय घसरून  पाण्यात पडला. यावेळी शब्बीरने पाण्यात उतरून मुलाला तळ्याबाहेर ढकलून दिले. व स्वत: बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना तसेच त्यांना पोहता येत नसल्याने त्यांच्या नाका- तोंडात पाणी गेल्याने त्यांना बाहेर येता आले नाही. यातच त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, पत्नी असा परिवार आहे. घटनेची नोंद  चंदगड पोलिसांत झाली आहे.
No comments:

Post a Comment