संयमी आमदारांच्या संयमाचा प्रशासनाने अंत पाहू नये - आमदार राजेश पाटील, महाराजस्व अभियानाअंतर्गत विस्तारीत समाधान योजनेचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

28 April 2023

संयमी आमदारांच्या संयमाचा प्रशासनाने अंत पाहू नये - आमदार राजेश पाटील, महाराजस्व अभियानाअंतर्गत विस्तारीत समाधान योजनेचा शुभारंभ

 

तेऊरवाडी येथे विस्तारीत समाधान योजनेच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना आमदार राजेश पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगडच्या जनतेप्रमाणे चंदगडचा आमदारही संयमी आहे. पण येथील शासकीय अधिकाऱ्यांनी या जनतेची  कामे वेळत पूर्ण करावी. अन्यथा मझ्या व येथील जनतेच्या संयमाचा अंत झाल्यास याच्या परिणामाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल, अस सज्जड दम चंदगड विधान सभा मतदार संघाचे आमदार राजेश पाटील यानी शासकीय अधिकाऱ्यांना दिला.

     तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील मराठी विघ्या मंदिरच्या प्रांगणात गुरूवारी महाराजस्व अभियानाअंतर्गत विस्तारीत समाधान योजनेचा शुभारंभ आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी अध्यक्ष स्थानावरून आमदार पाटील बोलत होते.

       ते पुढे बोलताना म्हणाले, ``तेऊरवाडी गावासाठी कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत. आता पाणंद रस्त्यासाठी ४८ लाख मंजूर केले आहेत. पण ही कामे करताना जर विनाकारण कोणी माहितीचा अधिकार वापरून कामे बंद पाडत असेल तर ते योग्य नाही. शासकीय अधिकाऱ्यांनी जनतेला विनाकारण हेलपाटे मारायला लावून त्रास दिल्यास त्याची गय केली जाणार नाही असे सांगून आम जनतेचा आमदार असल्याने विकास कामात कमी पडणार नसल्याचे आम. पाटील यानी सांगीतले.

        यावेळी माजी. रोहयो मंत्री भरमूअण्णा पाटील, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसिलदार राजेश चव्हाण, सरपंच सौ. मनिषा पाटील, वाय. बी. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. तेऊरवाडीतील प्राप्त लाभार्थ्यांना विविध दाखले व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. सर्व शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. या कार्यक्रमाला शासनाच्या विविध ११ विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उन्हाचा ग्रामस्थांना त्रास होऊ नये म्हणून पारंपारिक पद्धतीचा पाल्याचा मंडप घालण्यात आला होता.

      या कार्यक्रमाचे नियोजन तलाठी राजश्री पचंडी यांच्या नेतृत्वाखाली तेऊरवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केले होते. यावेळी उपसरपंच प्रकाश दळवी, सर्व ग्राम पंचायत सदस्य, समाजिक कार्यकर्ते अशोक पाटील, पो. पाटील प्रकाश पाटील, तंटामुक्त अध्यक्ष जनार्दन पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. ए.पाटील यांनी केले.

                       तलाठी राजश्री पचंडी यांचे कौतुक

         आमदार राजेश पाटील, माजी रोहयो मंत्री भरमू अण्णा पाटील यांनी जिल्ह्यातीत उत्कृष्ट कामाबद्दल व धाडसाने अतिक्रमणे हाटवून रस्ते केल्याबद्दल तलाठी राजश्री पचंडी यांचे  भरपूर कौतूक केले. तर भरमू अण्णा पाटील यांनी थेट पचंडी यांना बसर्गेचा चार्ज स्विकारण्याची विनंती केली.

No comments:

Post a Comment