चंदगड शहरामध्ये रविवारी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

28 April 2023

चंदगड शहरामध्ये रविवारी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती चंदगड यांच्या वतीने श्री महावीर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अशी तालुका स्तरावर संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन केले आहे. रविवार ३० एप्रिल २०२३ रोजी चंदगड पंचायत समितीच्या पटांगणात हा कार्यक्रम होईल. सकाळी ९.३० वाजता त्रिशरण व पंचशील ध्वजारोहण, सकाळी १० वाजता चित्ररथ व प्रभातफेरी, दुपारी १२ ते २ या वेळेत स्वागत समारंभ व व्याख्यान होईल. त्यानंतर अन्नदान होईल.

          या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ विद्रोही साहित्यिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे नेते पार्थ पोळके हे प्रमुख वक्ते असून कोल्हापूर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असतील.  कार्यक्रमाला प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पाणीपुरवठा उपअभियंता वर्ग एक सुभद्रा कांबळे, चंदगड वनपरिक्षेत्र अधिकारी एन. पी. भोसले, पाटणे वनक्षेत्र अधिकारी पी. ए. आवळे यांच्यासह जेष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment