हलकर्णी महाविद्यालयात सचेतना विभागामार्फत 'पाककला'स्पर्धा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

27 April 2023

हलकर्णी महाविद्यालयात सचेतना विभागामार्फत 'पाककला'स्पर्धा संपन्न

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सचेतना मंडळामार्फत 'पाककला ' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. शितल विशाल पाटील उपस्थित होत्या. 

         स्वागत प्रा. जी. ए. पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रा. आर. एच. काझी यांनी केले  व कार्यक्रमाचा हेतू विशद केला. सौ. शितल पाटील यांनी विद्यार्थीनींना नियोजनाचे महत्त्व सांगितले. आजी व आईकडून आपणाला कृतीतून शिक्षण मिळते. त्यासाठी आपल्याकडे प्रेम, काळजी, संयम असावा, तसेच सर्व कला अवगत असाव्यात असे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. शाहीन मुजावर, प्रा. अश्विनी राठोड, माधुरी पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या प्रसंगी माया पाटील, डॉ. जे. पी. पाटील महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी सुतार यांनी केले तर आभार प्रा. जे. एम. उत्तुरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment