जांबरे येथे प्राथमिक शाळेत संतोष गावडे यांच्या हस्ते टॅबचे उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

17 April 2023

जांबरे येथे प्राथमिक शाळेत संतोष गावडे यांच्या हस्ते टॅबचे उद्घाटन

जाबरे सत्कार करताना डॉ. परशराम गावडे शेजारी उद्योजक लक्ष्मण गावडे, सरपंच विष्णू गावडे .

जांबरे / सी. एल. वृत्तसेवा

       जांबरे (ता. चंदगड) येथील विद्या मंदिर शाळेत शासनाकडून १० टॅब प्राप्त झाले आहेत. त्या टॅबचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

      यावेळी जिल्हा बदली झालेले शिक्षक गणेश आकलोह यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे एम. टी. कांबळे यांनी विद्यार्थी शिक्षकांना 'झुंज कांदबरी भेट देऊन शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचा समन्वय चांगला झाला की शाळेचा सर्वागिण विकास होतो असे सांगितले. या वेळी उद्योजक लक्ष्मण गावडे, सरपंच विष्णू गावडे, डॉ. परशुराम गावडे, माजी सरपंच लक्ष्मण गावडे, परशराम गबाले, सुभाष कांबळे अनिल पाटील, चक्रपर काळे, नंदू शिंदे, जोत्स्ना सामत उपस्थित होत्या. आभार दीपक गोरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment