कागणी : डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना उपसरपंच सुहास बामणे.
कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
कागणी (ता. चंदगड) येथे जय भीम तरूण मंडळ तर्फे १३२ वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती येथे थाटामाटात साजरी झाली. सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून श्री. व्ही के सी पी विद्यालय आणि मराठी विद्या मंदीर कागणी आजी माजी शिक्षकांनीही उपस्थिती दर्शविली.
प्रमुख पाहुणे- ग्रामसेवक खवरे साहेब, उपसरपंच- सुहास बामणे, पोलिस कॉन्स्टेबल आनंदराव देसाई, पोलीस पाटील अमृतराव देसाई, ग्रा सदस्य जयश्री कांबळे, रामचंद्र देसाई, मंगल कृष्णा सुळेभावकर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मित "ग्रुप-ग्रामपंचायत कागणी" तर्फे 'साऊंड सिस्टीम भेट' स्वरूपात देण्यात आले. कागणी हायस्कूलचे मुख्याध्यापक- जी आर कांबळे, ए जे. देसाई, जयवंत पाटील, गोपाळ दैठणकर, मारुती लाळगे, सामाजिक कार्यकर्ते- पुरुषोत्तम सुळेभावकर, गोविंद कांबळे, सागर कांबळे, अचानक तरुण मंडळचे सदस्य उपस्थित होते. पाहुण्यांना शाल श्रीफळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तक पाहुण्यांना देण्यात आले.
No comments:
Post a Comment