चंदगड येथील जामा मस्जिद येथे रमजान निमित्त इफ्तार पार्टी उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

17 April 2023

चंदगड येथील जामा मस्जिद येथे रमजान निमित्त इफ्तार पार्टी उत्साहात

चंदगड येथील इफ्तार पार्टीवेळी उपस्थित मान्यवर.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     चंदगड येथील जामा मस्जिद येथे रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजण केले होते. यावेळी संजय चंदगडकर म्हणाले, ``येथे मुस्लिम व हिंदू बांधव एकत्र राहत असून आम्ही चंदगड नगरपंचायतीच्या वतीने विकासकामासाठी फंड या समाजाला दिला असून यापुढेही फंड कमी पडू देणार नाही.``

    चंदगड अर्बन बँकेचे  मॅनेजर नौशाद मुल्ला यांनी ५५ लाख निधी दिल्याबद्दल खासदार आमदारसो व नगराध्यक्ष नगरपंचायत सदस्य यांचे आभार मानले. यावेळी चंदगड अर्बन बँकेचे चेअरमन दयानंद काणेकर,   पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, चंदगड अर्बन बँकचे सदस्य, नगरपंचायतीचे सदस्य, मुस्लिम समाज अध्यक्ष शानूर मदार, उपाध्यक्ष अमजद मुल्ला,  सेक्रेटरी जुबेर आगा, नवीद अत्तार, हक्कांनी दरवाजकर, झाकीर तगारे, युसुफ् शेरखान, अस्लम तगारे, इम्त्याज मकानदार, मजीद तगारे, समिऊला दरवाजकर, संकलेन नाईक, अल्ताफ आगा, अझर मदार, शबीर शेरखान उपस्तिथ होते. नगरसेवक झाकीर नाईक यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment