मुख्याध्यापक सुधीर मुतकेकर यांना शिक्षण विस्तार अधिकारीपदी पदोन्नती - चंदगड लाईव्ह न्युज

17 April 2023

मुख्याध्यापक सुधीर मुतकेकर यांना शिक्षण विस्तार अधिकारीपदी पदोन्नती

सुधीर मुतकेकर

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

        मलतवाडी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तसेच कोवाड केंद्राचे इन्चार्ज केंद्रप्रमुख सुधीर भावकू मुतकेकर (मुळ गाव कुदनूर, ता. चंदगड) यांना शिक्षण विस्तार अधिकारी पदी बढती मिळाली आहे. याबाबतचा आदेश जिल्हा परिषद कोल्हापूर कडून नुकताच प्राप्त झाला असून त्यांची चंदगड तालुक्यातील दाटे बीटचे विस्ताराधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

सुधीर मुककेकर यांचा पदोन्नती बद्दल सत्कार करताना केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, सोबत शाळेतील शिक्षक व केंद्रातील मुख्याध्यापक.

      शिक्षक, पदवीधर अध्यापक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख ते शिक्षण विस्तार अधिकारी अशा चढत्या प्रवासाबद्दल केंद्रीय प्राथमिक शाळा  कोवाड मार्फत मुतकेकर यांचा केंद्रमुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरी फेटा, शाल, श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या. 

        यावेळी अध्यापक गणपती लोहार, श्रीकांत आप्पाजी पाटील, अध्यापिका उज्वला नेसरकर, भावना अतवाडकर, मधुमती गावस, कविता पाटील यांच्यासह केंद्रातील मुख्याध्यापक आप्पाराव पाटील (किणी), संतान लोबो (तेऊरवाडी), बसवाणी शिरगे (कामेवाडी), सुवर्णा आंबेवाडकर (दुंडगे), श्रीकांत सुबराव पाटील (जक्कनहट्टी) आदी मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक कविता पाटील यांनी केले. 

No comments:

Post a Comment