चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
मुगळी (ता. चंदगड) येथील रवळनाथ सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी पांडुरंग रेडेकर यांची, तर उपाध्यक्षपदी कान्होबा शिवणगेकर यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश सावंत यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी अध्यक्ष पदासाठी पांडुरंग रेडेकर व जयवंत पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले तर उपाध्यक्ष पदासाठी कान्होबा शिवणगेकर व बाबू रेडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून रेडेकर व उपाध्यक्ष शिवणगेकर यांना प्रत्येकी १० मते मिळाली तर पाटील व रेडेकर यांना प्रत्येकी ३ मते मिळाली. अध्यक्षपदासाठी पांडुरंग रेडेकर व उपाध्यक्ष पदी कान्होबा शिवणगेकर विजयी झाले. निवडीचा निकाल लागताच कार्यकर्त्यांनी फटाके लावुन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी गोविंद कलागते, नारायण रेडेकर, मारुती पाटील, परसु चव्हाण, दत्तू कलागते, विठ्ठल पाटील, आनंदी मळेकर, कल्पना रेडेकर, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. सचिव पांडुरंग देसाई यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment