सुंदर हस्ताक्षर ही व्यक्तीमत्वाची ओळख - प्राचार्य एम. एम. गावडे, हस्ताक्षर शिबिराला उदंड प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

16 April 2023

सुंदर हस्ताक्षर ही व्यक्तीमत्वाची ओळख - प्राचार्य एम. एम. गावडे, हस्ताक्षर शिबिराला उदंड प्रतिसाद

 


कारवे / सी. एल. वृत्तसेवा

आजच्या काळात कॉम्प्युटरच्या वापरामुळे मुळची सुलेखनाचे कला ही नाहीशी होवू लागली आहे.सुंदर हस्ताक्षर हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचाच एक हिस्सा असतो.  नीटनेटकेपणा, शिस्त, कलात्मकता, असे कितीतरी गुण एखाद्याचे अक्षर पाहून आपल्या लक्षात येतात. सुंदर हस्ताक्षर ही माणसाची वेगळी ओळख निर्माण करून देते. प्रत्येकालाच आपले अक्षर सुंदर असावे, असे वाटते. आपल्या मुलांचे हस्ताक्षर सुंदर वळणदार असावे यासाठी पालकांनी कटाक्षाने लक्ष देणे गरजच आजच्या काळात निर्माण झाली आहे तर हस्ताक्षर लेखन कला टिकून रहावे यासाठी शाळा, शिक्षकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे." असे प्रतिपादन प्राचार्य एम. एम. गावडे यांनी केले. चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ व प्राथमिक शिक्षक संघ आयोजित हस्ताक्षर शिबिर उद्घाटन प्रसंगी श्री. गावडे बोलत होते.

     प्रास्ताविक संजय साबळे यांनी केले. यावेळी प्राथमिक शिक्षक संघाकडून सर्व विधार्थ्यांना पेन भेट देण्यात आली. श्री. राजेंद्र शिवणगेकर, मनोहर नाईक, अविनाश दावणे हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. 

हस्ताक्षर शिबीराला ७७ विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाला प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सदानंद पाटील, प्रा. पी. डी. गावडे, शाहू पाटील, महेश जांबोटकर, विजय मोरे, मनोहर बोकडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एन. पाटील तर आभार एम. एन. शिवणगेकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment