तिलारीनगर ते कोदाळी तिलारी घाट रस्ता १५ मे पर्यंत दुरुस्ती करा अन्यथा उपोषण - चंदगड लाईव्ह न्युज

21 April 2023

तिलारीनगर ते कोदाळी तिलारी घाट रस्ता १५ मे पर्यंत दुरुस्ती करा अन्यथा उपोषण

 


दोडामार्ग, दि. २१ एप्रिल प्रतिनिधी

दोडामार्ग ते कोल्हापूर चंदगड मार्गावरील तिलारीनगर महावितरण वसाहत ते कोदाळी तिलारी घाट पर्यंत चार किलोमीटर रस्ता पावसाळा जवळ आला तरी दुरुस्ती केला नाही. नवीन रस्ता रूंदीकरण डांबरीकरण नावाखाली मुळ रस्ता याची वाट लावली आहे. त्यामुळे शेकडो वाहन धारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.याकडे बांधकाम विभाग यांचे लक्ष वेधण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, पञकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी बांधकाम विभाग व तहसीलदार चंदगड यांना निवेदन दिले आहे. १५ मे पर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे उखडलेला रस्ता याची डागडुजी झाली नाही तर १६ मे रोजी खड्डयात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. 

  दोडामार्ग येथील शिवसेना पदाधिकारी संदेश दौलतराव राणे, प्रदीप गावडे, दशरथ मोरजकर, संदेश वरक, पञकार तुळशीदास नाईक यांनी शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड, चंदगड तहसीलदार, पोलिस ठाणे चंदगड येथे जाऊन संबंधित अधिकारी यांना या धोकादायक बनलेला रस्ता बांधकाम विभाग संबंधित ठेकेदार कडून कामाला झालेला विलंब नवीन रस्ता रूंदीकरण डांबरीकरण नावाखाली मुळ डांबरी रस्ता उखडला खड्डे पडले. यामुळे वाहन चालवणे अवघड झाले आहे हे निदर्शनास आणून दिले. 

       चंदगड ते तिलारीनगर महावितरण वसाहत ते कोदाळी तिलारी घाट पर्यंत आपण रस्ता रूंदीकरण डांबरीकरण करण्यासाठी ज्या ठेकेदार कंपनी यांना काम दिले आहे. त्यांनी रस्ता रूंदीकरण करताना या ठिकाणी जो मुळ रस्ता होता, तो उखडला आहे. शिवाय या चार किलोमीटर रस्त्यावर दुचाकी चार चाकी वाहन नेण्यासारखी परस्थिती राहिलेली नाही. हा चार किलोमीटर रस्ता उखडला गेला आहे हजारो मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. शिवाय वाहनाचे नुकसान होत आहे. 

    संबंधित ठेकेदार कंपनी यांनी रस्ता रूंदीकरण करण्यासाठी जेसीबी मशीन लावून मुळ रस्ता खराब करून सोडला आहे. चंदगड ते दोडामार्ग गोवा हा राज्य महामार्ग कोल्हापूर बेळगाव गोवा असा जोडला गेला आहे. त्यामुळे दरदिवशी शेकडो वाहने जवळचा मार्ग म्हणून या रस्त्याचा वाहतूकीसाठी उपयोग करतात पण सद्या हा चार किलोमीटर रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.  आता ही धोकादायक स्थिती आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. या अगोदर उखडलेला रस्ता पडलेले खड्डे याची डागडुजी झाली नाही तर पावसाळ्यात अनेक अपघात होऊन वाहन धारक नागरिक यांच्या जीवावर बेतू शकते. पण आपल्या बांधकाम विभागाकडून संबंधित ठेकेदार कंपनी कडून अद्याप दुरुस्ती केली गेली नाही. 

   तिलारीनगर महावितरण वसाहत ते कोदाळी तिलारी घाट हा चार किलोमीटर रस्ता धोकादायक बनला आहे. या उखडलेला रस्ता पडलेले खड्डे याची डागडुजी १५ मे पूर्वी न झाल्यास १६ मे रोजी कोदाळी येथे पडलेल्या खड्डयात बसून उपोषणाला बसणार आहोत. यामुळे वाहतूक समस्या नागरीकांची गैरसोय याला बांधकाम विभाग संबंधित ठेकेदार कंपनी जबाबदार राहील. असा इशारा दिला आहे. याची निवेदन पालकमंत्री दीपक केसरकर इतरांना दिली आहेत.No comments:

Post a Comment