हलकर्णी महाविद्यालयातील कविता वाचन स्पर्धेत माधुरी सुतार तर गीत गायन मध्ये हर्षद काबंळे प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

22 April 2023

हलकर्णी महाविद्यालयातील कविता वाचन स्पर्धेत माधुरी सुतार तर गीत गायन मध्ये हर्षद काबंळे प्रथम

 चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात सांस्कृतिक विभागामार्फत कविता वाचन आणि गीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. प्राचार्य डॉ .बी डी अजळकर  होते .सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा . डॉ . चंद्रकांत पोतदार यांनी आपल्या प्रास्ताविकातून या स्पर्धेचा हेतू विशद केला . यावेळी व्यासपीठावर नॅक समन्वयक डॉ राजेश घोरपडे व सह समन्वयक डॉ .जे जे व्हटकर व आदी मान्यवर उपस्थित होते . स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा डॉ चंद्रकांत पोतदार प्रा.ए ए कलजी,  सौ .वंदना केळकर प्रा . सुवर्णा पाटील  प्रा .एस बी कांबळे प्रा एन एम कुचेकर यांनी काम पाहिले .
या स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे कविता वाचन स्पर्धा :-- प्रथम क्रमांक माधुरी भावकू सुतार (बीकॉम भाग तीन) द्वितीय क्रमांक इंद्रायणी लक्ष्मण पाटील (बीकॉम दोन), तृतीय क्रमांक अनुराधा बापू शिरगावकर (अकरावी सायन्स ब)  आणि उत्तेजनार्थ आरती परशराम पाटील( बीकॉम तीन) 
गीत गायन स्पर्धा निकाल : --प्रथम क्रमांक हर्षद मधुकर कांबळे (बीकॉम दोन) , द्वितीय क्रमांक अनुराधा बापू शिरगावकर (अकरावी सायन्स ब ),तृतीय क्रमांक ऐश्वर्या शिवाजी पाटील (बीकॉम भाग) एक आणि उत्तेजनार्थ सुनिता पाटील( बीकॉम भाग)  या विद्यार्थानी अनुक्रमे नंबर मिळवले..सूत्रसंचालन प्रा.एस ए पाटील यांनी केले तर सर्वांचे आभार प्रा. एन एम कुचेकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment