बौद्धिक संपदा ही स्वतःची संपदा आहे - डॉ. सादळे, हलकर्णी महाविद्यालयात 'आयपीआर' वर शिबिर संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

22 April 2023

बौद्धिक संपदा ही स्वतःची संपदा आहे - डॉ. सादळे, हलकर्णी महाविद्यालयात 'आयपीआर' वर शिबिर संपन्न


चंदगड/प्रतिनिधी

आयपीआर वाढवणे ही सर्वांची गरज . बौद्धिक संपदा म्हणजे काय हे समजून घ्या संशोधन दोन्ही बाजूने होतं .निसर्गाने दिलेल्या गोष्टी आपण शोधू शकतो .मानवनिर्मित गोष्टींचा पेटंट घेता येत, नाविन्यता ही मानवनिर्मित आहे. तंत्रज्ञान वेगवेगळ्या रूपात विकसित होत आहे .सध्याचे युग हे कल्पनेच युग आहे आणि कल्पना प्रत्येकाकडे असणे गरजेचे. संकल्पनेला मोठं महत्व प्राप्त झाल आहे. बौद्धिक संपदा क्रयशक्तीला चालना देणारी गोष्ट आहे. तंत्रज्ञान नवीन असेल तर नाविन्यपूर्ण पद्धती वापरल्या पाहिजेत. भविष्यात तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित झालेलं असेल. डोक्यात असणारी माहिती बाहेर विविध रूपात व्यक्त होणे गरजेचे. बौद्धिक संपदा ही स्वतःची संपदा आहे आणि त्यामुळे कल्पनेच रजिस्ट्रेशन करणं म्हणजे आय पी आर होय 'असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आय पी आर समन्वयक तथा तंत्रज्ञान विभागातील प्रा.डॉ शिवाजी सादळे यांनी केेेले.

ते हलकर्णी ता. चंदगड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आय पी आर विभाग आणि नॅक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 'बौद्धिक संपदा ' या विषयावरील मार्गदर्शन शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी डी. अजळकर होते.प्रारंभी प्रास्ताविकातून डॉ .चंद्रकांत पोतदार यांनी कार्यक्रमाचा हेतु विषद केला . नॅक समन्वयक डॉ . राजेश घोरपडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला .प्राचार्य डॉ . बी. डी अजळकर यांनी स्वागत केले . यावेळी व्यासपीठावर सहसमन्वयक डॉ .जे .जे . व्हटकर उपस्थित होत्या.याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते . सुत्रसंचालन प्रा.एस. ए .पाटील यांनी केले तर आभार आय पी आर विभाग प्रमुख प्रा.पी .ए. पाटील यांनी मानले.


No comments:

Post a Comment