व्यावसायिक जीवनात इंग्रजी संभाषणाला अधिक महत्त्व - डॉ. घोळसे, हलकर्णी महाविद्यालयात 'कार्पोरेट इंग्लिश' कोर्सचे उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

22 April 2023

व्यावसायिक जीवनात इंग्रजी संभाषणाला अधिक महत्त्व - डॉ. घोळसे, हलकर्णी महाविद्यालयात 'कार्पोरेट इंग्लिश' कोर्सचे उद्घाटन



चंदगड/प्रतिनिधी 
व्यावसायिक क्षेत्रात अनेक संधी आहेत. विविध कौशल्य जीवन घडवतात. विपणन व व्यवसायाच्या उन्नतीसाठी इंग्रजी भाषा अवगत होणे गरजेचे. कार्पोरेट इंग्लिश कोर्सला महत्त्व आहे.  आज जीवन वेळेनुसार जगणं आव्हानात्मक. स्वतःमध्ये संभाषण वृत्ती वाढवा म्हणजे समाजात ताठ मानेने जगू शकता. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवला तर दुसऱ्यावर प्रभाव पाडू शकता. विविध कंपन्यांनी असे कोर्स मोफत सुरू केले ते केवळ कौशल्य विकसित करण्यासाठी. जगात संभाषणासाठी इंग्रजी हे महत्त्वाचे माध्यम बनले आहे. व्यवसायिक क्षेत्रात वाचणे लिहिणे एवढेच महत्त्वाचे नाही तर त्यावर प्रभुत्व मिळवणे महत्त्वाचे. शब्दसंग्रह वाढवा प्रभुत्व मिळवाल. भाषा हे संभाषणाचे महत्त्वाचे माध्यम आहे. प्रत्येक गोष्ट महाविद्यालय पातळीवर अवगत करा. स्वतःची क्षमता दाखवा. कष्ट करण्याची तयारी ठेवा नवीन संधीचा फायदा घ्या म्हणजे यशस्वी व्हाल.' असे प्रतिपादन प्रा.डाॅ मोहन घोळसे यानी केले.ते
       हलकर्णी ता. चंदगड येथील  यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात इंग्रजी विभागामार्फत आयोजित 'कार्पोरेट इंग्लिश' कोर्सच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर होते. 
प्रारंभी 'कार्पोरेट इंग्लिश' कोर्स चे महत्त्व आपल्या प्रास्ताविकातून प्रा. डॉ. आय. आर. जरळी यानी असे कोर्स आपले व्यक्तिमत्व विकसित करतात आपल्यामध्ये लपलेले ज्ञान अशा कोर्समधून आपल्याला व्यक्त करता येते विविध कौशल्य कोर्स आपणा साठी उपलब्ध आहेत त्यातून आपण आपले आयुष्य घडवू शकतो. कौशल्यांना वाव दिला तर स्वतःला व्यक्त होता येते आणि लोकप्रियता प्राप्त होते. अनेक अडचणी येत असतात त्यातून आपण मार्ग शोधत पात्रता सिद्ध केली पाहिजे'. 
 डॉ. घाळसे पुढे म्हणाले, 'जागतिकीकरणात व्यवसाय, माहिती, तंत्रज्ञान आणि संसाधने यांची देवाणघेवाण जगामध्ये होत असते. व्यवसाय आणि इंग्रजी यांचे जवळचे नाते असल्याने या सर्व गोष्टी इंग्रजी मुळे शक्य आहेत. यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे.'
यावेळी व्यासपीठावर नॅक समन्वयक डॉ. आर.ए. घोरपडे उपस्थित होते.यावेळी प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा. एस. ए. पाटील यांनी केले तर आभार प्रा. व्ही. व्ही. कोलकार  यांनी मानले.


No comments:

Post a Comment