कालकुंद्री येथे श्री कल्मेश्वर मंदिर जीर्णोद्धार पायाभरणी कार्यक्रम उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

26 April 2023

कालकुंद्री येथे श्री कल्मेश्वर मंदिर जीर्णोद्धार पायाभरणी कार्यक्रम उत्साहात


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

    कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत श्री कल्मेश्वर मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी माजी कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला होता. नुकताच २२ एप्रिल २०२३ रोजी मंदिर बांधकामाचा पायाभरणी समारंभ  हजारो ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आला. सरपंच छाया जोशी यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजक व गावचे सुपुत्र अशोक स पाटील यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली.
        बांधकाम कमिटी अध्यक्ष मनोहर पाटील यांनी स्वागत केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते यांचे पाटील उपसरपंच संभाजी पाटील मुंबई ग्रामस्थ मंडळाचे प्रतिनिधी मारुती गोपाळ जोशी, बाबाजी पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य, देणगीदार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक विधी वर्शीलदार लक्ष्मण पाटील दांपत्याच्या हस्ते करण्यात आला. 
    तत्पूर्वी सकाळी ताम्रपर्णी नदी घाटावरून शेकडो महिलांच्या उपस्थितीत नदी घाट ते मंदिरापर्यंत कलश मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शंकर कोले, बाजीराव पाटील, सुरेश नाईक, अरविंद कोकितकर, प्रा. व्ही आर पाटील, शंकर सांबरेकर आदींसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. सद्यस्थितीत ग्रामस्थांच्या श्रमदानातून पाया खुदायीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

No comments:

Post a Comment