चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील खेडूत शिक्षण मंडळाच्या र. भा. माडखोलकर महाविद्यालयामध्ये शनिवार दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता करिअर गायडन्स व प्लेसमेंट सेलच्या वतीने आयसीआयसीआय बँकेत रिलेशनशिप मॅनेजर पदाच्या भरतीसाठी नोकर भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे.
सदर पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार पात्र राहील. तसेच उमेदवाराचे वय 19 ते 25 वर्षे असावे. दहावी व बारावीमध्ये किमान 50 टक्के गुण असावेत या पदासाठी 2.70 लाख ते 3.20 लाख इतका वार्षिक पगार राहील. तरी इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची मूळ कागदपत्रे व एक सत्य प्रत घेऊन वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील व प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. आर. एन साळुंखे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment