डॉ. के. एस. तनंगे मार्गदर्शन करताना.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
"विद्यार्थ्यांनी जीवनावश्यक कौशल्ये आत्मसात करावीत. आपल्या क्षमता वृद्धिंगत कराव्यात. तसेच आपल्या क्षमतेचा सुनियोजित व परिपूर्ण वापर केला पाहिजे. रुळलेल्या वाटेने चालण्याऐवजी करिअरच्या नवनव्या संधीच्या कडे आश्वासक दृष्टीने पाहिले पाहिजे. आपले ज्ञान नेहमी अद्ययावत ठेवले पाहिजे. मेहनत आणि नियोजन यांची सांगड घातली तर निश्चितच उत्तुंग यशाला गवसणी घालणे शक्य आहे." असे प्रतिपादन डॉ. के. एस. तनंगे यांनी केले.
ते येथील माडखोलकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने आयोजित करिअरच्या संधी या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. पी. आर .पाटील यांनी विद्यार्थ्यांनी कालानुरूप बदल स्वीकारले पाहिजेत. नवे तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे व आपली विद्यार्थी वृत्ती नेहमी जपली पाहिजे, असे आवाहन केले. प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. एस. सावंत यांनी केले. व्ही. के. गावडे यांनी आभार मानले. सुत्रसंचालन स्वनील गावडे याने केले. यावेळी भित्तीपत्रकाचे अनावरण तसेच पोस्टर प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास डॉ. जी. वाय कांबळे, एस. व्ही. कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment