यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महात्मा जोतिबा फुलेंना अभिवादन - चंदगड लाईव्ह न्युज

11 April 2023

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महात्मा जोतिबा फुलेंना अभिवादन

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात  क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव विशाल पाटील, प्राचार्य. डॉ. बी. अजळकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा एस एन पाटील यांनी केले. स्वागत प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांनी केले. महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सचिव विशाल पाटील यांनी करून अभिवादन केले. यावेळी डॉ. ए पी गवळी, प्रा के. एम. गोनुगडे, प्रा एच के गावडे, प्रा. डॉ. आर. ए. घोरपडे, डॉ. ए. व्ही. पाटील, प्रा. पी. ए. पाटील, डॉ. ए व्ही दोरुगडे, प्रा. एन के जावीर, प्रा आर बी गावडे, प्रा एस एन खरूजकर, प्रा सी एम तेली,  बी बी नाईक, संदीप पाटील आदी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment