कालकुंद्री येथील विठ्ठल- रखुमाई मंदिरास ज्योतिर्लिंग यात्रा कमिटीकडून देणगी - चंदगड लाईव्ह न्युज

12 April 2023

कालकुंद्री येथील विठ्ठल- रखुमाई मंदिरास ज्योतिर्लिंग यात्रा कमिटीकडून देणगी

कालकुंद्री येथील विठ्ठल- रखुमाई मंदिर बांधकाम साठी देणगी सुपूर्त करताना ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी सदस्य.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथे बांधकाम सुरू असलेल्या विठ्ठल- रखुमाई मंदिरास ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी यांच्याकडून १० हजार १०१ रुपयांची रोख देणगी देण्यात आली. कालकुंद्री येथून यावर्षी ज्योतिर्लिंग यात्रेसाठी भाविक गेले होते. यात्रेसाठी वर्गणी व देणगीतील जमा शिलकीतून वरील रक्कम मंदिर बांधकामासाठी नुकतीच सुपूर्द केली. यावेळी दत्तू तेऊरवाडकर, राजेंद्र पाटील, कल्लाप्पा पाटील, विष्णू पाटील, रणजीत पाटील, नरसु पाटील आदींची उपस्थिती होती. उर्वरित बांधकामासाठी दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने देणगी द्यावी. असे आवाहन यावेळी मंदिर बांधकाम कमिटीच्या वतीने करण्यात आले.


No comments:

Post a Comment