वंचित बहुजन आघाडी मार्फत महात्मा फुले जयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

12 April 2023

वंचित बहुजन आघाडी मार्फत महात्मा फुले जयंती साजरी

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
         वंचित बहुजन आघाडी व युवा आघाडी चंदगड तालुका यांच्यावतीने चंदगड येथील कार्यालयात माजी प्राचार्य विष्णू सुभाना कार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रास्ताविक प्रा. ए. डी. कांबळे यांनी फूले यांच्या कार्याचा आढावा घेतला नूतन नियुक्ती झालेल्या युवा पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. 
        या कार्यक्रमाला संतोष कांबळे (अध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी), प्रा. देवानंद कदम, संजय देसाई (युवा आघाडी तालुका संघटक) इम्रान मदार (उपाध्यक्ष युवा आघाडी) मुस्ताक मदार (सदस्य), शिवाजी कांबळे (महासचिव), रामजी कांबळे (विद्यार्थी संघटक) भेबा कांबळे, दौलत कांबळे(गवसे), महादेव कांबळे (गवसे) हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार आर. पी. कांबळे यांनी मानले.


No comments:

Post a Comment