हलकर्णी महाविद्यालयात आम. सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

12 April 2023

हलकर्णी महाविद्यालयात आम. सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           'रक्तदान करून आपण खूप लोकांचे जीव वाचवू शकतो. रक्तदान हे पुण्याचे काम आहे. के. एल. ई. सारख्या मोठ्या हॉस्पिटलचे काम हे कौतुकास्पद आहे. रक्तदान केल्याने आपला तोटा होत नाही तर समाजसेवा केल्याचे समाधान मिळते' असे प्रतिपादन दौलत विश्वस्त संस्थेचे  मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांनी केले. हलकर्णी (ता. चंदगड) येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात 'रक्तदान शिबीर' उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून केले. महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री  आम. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व बेळगाव येथील के. एल. ई. हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी गोपाळराव पाटील  होते. 

         यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण, सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील, वीरभद्र वाघराळे, डॉ. जी. एस.  पाटील, संचालक उत्तम पाटील, वसंतराव निकम, अशोक पाटील, शिवाजी हसबे, पुंडलिक पाटील, तुकाराम पाटील, बाबुराव पाटील, शिवाजी तुपारे, माजी जि. प. सदस्य राजेंद्र परीट, नगरसेवक दिलीप चंदगडकर, अभिजीत गुरबे, अशोक दाणी, शिवाजी कलखांबकर, संदीप नांदवडेकर (तालुका युवा अध्यक्ष), सदानंद पाटील, प्राचार्य डॉ. बी. डी .अजळकर, राजाराम पाटील, नारायण दळवी, निंगाप्पा पाटील, यशवंत कांबळे आदी सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच के. एल. ई. हॉस्पिटलचे डॉ. विठ्ठल माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

           प्रारंभी प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. यु. एस. पाटील यांनी केले. मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर व आदींनी केले. यावेळी डॉ. विठ्ठल माने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,' रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्त देणे म्हणजे दुसऱ्याला जीवन देणे होय. आपण कुणाला तरी रक्त देऊन आयुष्य वाचवतो यातून समाधान लाभते.' या शिबिरात विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, संस्थेचे  प्रतिनिधी, काँग्रेसचे कार्यकर्ते आदींनी रक्तदान केले.

           माजी गृहराज्यमंत्री माननीय आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले व त्यांचा वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी के. एल. इ. हॉस्पिटल ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी व त्यांचे सर्व स्टाफ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी विविध पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. जी. जे. गावडे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. राजेश घोरपडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment