तेऊरवाडी येथे गुरूवारी विस्तारीत समाधान योजना शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

25 April 2023

तेऊरवाडी येथे गुरूवारी विस्तारीत समाधान योजना शुभारंभ

 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

           महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानाअंतर्गत विस्तारीत समाधान योजनेचा शुभारंभ तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे गुरुवार दि. २७ रोजी चंदगड विधान सभेचे आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितित होत आहे.

      यावेळी शासनाच्या विविध विकास योजनांची माहिती, मार्गदर्शन व प्रत्यक्ष लाभ ग्रामस्थांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला गडहिंग्लजचे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, माजी  रोहयो मंत्री भरमूअण्णा पाटील, भाजप कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील, तहसिलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, पोलिस निरिक्षक संतोष घोळवे  आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन तेऊरवाडी ग्रामस्थांनी केले आहे.

No comments:

Post a Comment