शेक्सपियर नावाचा साहित्य सूर्य २३ एप्रिलला मावळला - डॉ. बी. ए. सावंत, माडखोलकर महाविद्यालयात “विल्यम शेक्सपियर: नाटककार आणि कलाकार” कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

25 April 2023

शेक्सपियर नावाचा साहित्य सूर्य २३ एप्रिलला मावळला - डॉ. बी. ए. सावंत, माडखोलकर महाविद्यालयात “विल्यम शेक्सपियर: नाटककार आणि कलाकार” कार्यक्रमचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          मानवी मनाचे खोलवर चिंतन आणि नानाविध पैलू आपल्या मिश्किल शैलीने मांडणारा शेक्सपियर नावाचा साहित्य सूर्य २३ एप्रिल १६१६ रोजी मावळला असे प्रतिपादन डॉ. बळीराम सावंत यांनी केले. ते चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयामध्ये शेक्सपियर यांच्या जन्म आणि मृत्यू दिनाचे औचित्य साधून सोमवार दि. २४ एप्रिल २०२३ रोजी आयोजित केलेल्या “विल्यम शेक्सपियर: नाटककार आणि कलाकार” या कार्यक्रमात बोलताना केले. 

       “Ignorance is the curse of God; knowledge is the wing wherewith we fly to heaven” अशी मांडणी करणारा नाटककार जगदविख्यात झाला, तो केवळ आपल्या अपार प्रतिभेने ज्याने जगाला ३७ नाटके, १५४ सुनीत काव्ये आणि २ मोठ्या कविता बहाल केल्या ज्या त्याच्या मृत्युच्या ४०० वर्षानंतरही तितक्याच खोलवर मानवी मनाचा ठाव घेतात. रसिक मान्यतेबरोबरच समीक्षकांनीही गौरविलेले त्यांचे साहित्य अभिजात बनले ते त्यांच्या बहुआयामी मांडणीने ज्याचे प्रत्येक वेळी नवीन अन्वयार्थ लावले जातात असे ते म्हणाले. 

       शेक्सपियर यांचे साहित्य इंग्रजी भाषा समृद्ध बनवते असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक इंग्रजी विभागप्रमुख सौ. एस. बी. दिवेकर यांनी केले तर पाहुण्यांची ओळख डॉ. एन. के. पाटील यांनी करून दिली. कार्यक्रमाच्या सुरवातीला शेक्सपियर यांच्या आयुष्याचे तसेच लेखनाचे दर्शन घडविणाऱ्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांच्या हस्ते पाहुण्यांच्या उपस्थितीत झाले. सूत्रसंचालन कु. दिव्या फाटक हिने केले तर आभार कु. चंद्रभागा गावडे हिने मानले. या प्रसंगी प्रा. आर. के. तेलगोटे, डॉ. डी. ए. मोरे, प्रा. मायाप्पा पाटील, डॉ. एस. डी. गावडे, डॉ. एस. एन. पाटील, भाषा विभागाचे विद्यार्थी आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment