इंग्रजी भाषेमुळे रोजगाराच्या जागतिक संधी - प्रा. मायाप्पा पाटील, इंग्रजी भाषा दिन - चंदगड लाईव्ह न्युज

25 April 2023

इंग्रजी भाषेमुळे रोजगाराच्या जागतिक संधी - प्रा. मायाप्पा पाटील, इंग्रजी भाषा दिन

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      इंग्रजी भाषेमुळे रोजगाराच्या जागतिक संधी प्राप्त होतात असे मत प्रा. मायाप्पा पाटील यांनी र. भा. माडखोलकर महाविद्यालयामध्ये शेक्सपियर यांचा जन्म आणि मृत्यू दिन तसेच जागतिक इंग्रजी भाषा दिनाचे औचित्य साधून आयोजीत केलेल्या कार्यक्रमामध्ये व्यक्त केले. 

       इंग्रजी भाषा हि तशी शिकण्यासाठी सर्वात सोपी भाषा असून या भाषेमधील कौशल्य आत्मसात केल्यास रोजगाराच्या विविध संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. कोणत्याही भाषेमधील मधुरता हि वक्त्याचे उच्चार, विचारांची मांडणी आणि त्याचा क्रम, योग्य शब्दांची निवड, ई. गोष्टींवर अवलंबून असतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे कौशल्य आत्मसात करावे असे ते म्हणाले.

      भाषेची सुंदरता हि व्यक्तीचे व्यक्तिमत्व खुलवते आणि इंग्रजी भाषा त्यामध्ये निश्चितच महत्वाची भूमिका बजावते असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रास्ताविक डॉ. एन. के. पाटील सर यांनी केले तर पाहुण्यांची ओळख इंग्रजी विभागप्रमुख प्रा. सौ. एस. बी. दिवेकर यांनी करून दिली. प्रा. आर. के तेलगोटे आणि डॉ. डी. ए. मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी बावडेकर हिने केले व आभार दिशा गवस हिने मानले. यावेळी डॉ. एस. एन. पाटील, डॉ. एस. डी. गावडे, प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. एस. एस. सावंत, डॉ. ए. वाय. जाधव, डॉ. पी. एल. भादवणकर, डॉ. जी. वाय. कांबळे, प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, प्रा. टी. एम. पाटील, प्रा. ए. डी. कांबळे आदि उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment