चंदगड येथे रिझर्व बँकेचा स्थापना दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान दिन साजरा या प्रसंगी उपस्थित मान्यवर. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
वंचित बहुजन आघाडी व युवा आघाडी चंदगड तालुक्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात १ एप्रिल रिझर्व बँकेचा स्थापना दिवस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान हा दिन साजरा करण्यात आला.
चंदगड तालुका यांच्या वतीने १ एप्रिल १९३५ भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापने मागील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान या दिनानिमित्त प्रा. विष्णू सुभाना कार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख व्यक्ते म्हणून संतोष कांबळे (तालुका अध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी) कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, बँकांची बँक असणारी 'रिझर्व बँक ऑफ इंडिया' ज्या बँकेमार्फत संपूर्ण देशाचा आर्थिक व्यवहार सांभाळला जातो. ती रिझर्व बँक ऑफ इंडिया या बँकेच्या स्थापने मागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुमूल्य योगदान आहे. एक अर्थतज्ञ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायमपणे या देशाचा विचार केला असल्याचे सांगितेल.
अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडी तालुका चंदगडचे अध्यक्ष प्रा. विष्णू सुभांना कार्वेकर हे अध्यक्षपदी होते. कार्यक्रमाची प्रास्ताविक भिबा कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाला संजय देसाई (युवा आघाडी तालुका संघटक) इम्रान मदार (उपाध्यक्ष युवा आघाडी) मुस्ताक मदार, गौतम कांबळे (अडकुर), शिवाजी कांबळे (न्हावेली), अशोक पेडणेकर (न्हावेली), शिवाजी कांबळे (शिनोळी), अभिजीत कांबळे (डूक्करवाडी) कार्यक्रमाचे आभार प्रा.देवानंद कदम यांनी मांडले.
No comments:
Post a Comment