प्राथमिक शिक्षक संघाचे चंदगड तालुकास्तरीय अधिवेशन शनिवारी - चंदगड लाईव्ह न्युज

06 April 2023

प्राथमिक शिक्षक संघाचे चंदगड तालुकास्तरीय अधिवेशन शनिवारी

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट) शाखा चंदगडचे त्रैवार्षिक अधिवेशन शनिवार दिनांक ८ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता महादेवराव वांद्रे विद्या संकुल तुर्केवाडी फाटा येथे आयोजित करण्यात आले आहे.

  आमदार राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील, काँग्रेस प्रदेश कार्यकारणी सदस्य गोपाळराव पाटील, शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील, सरचिटणीस सुनील पाटील, शिक्षक बँक चेअरमन सुनील एडके, शिक्षक नेते मधुकर येसणे, रावसाहेब देसाई, सुभाष निकम, आदींची उपस्थिती राहणार आहे, यावेळी तालुक्यातील सर्व शिक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षक संघ शाखा चंदगड मार्फत करण्यात आले आहे.No comments:

Post a Comment