काजू बोर्ड कार्यक्षेत्रात गडहिंग्लज तालूक्याचा समावेश करावा - अॅड हेमंत कोलेकर - चंदगड लाईव्ह न्युज

06 April 2023

काजू बोर्ड कार्यक्षेत्रात गडहिंग्लज तालूक्याचा समावेश करावा - अॅड हेमंत कोलेकर

भाजपचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष हेमंत कोलेकर चंद्रकात पाटील याना निवेदन देताना.

नेसरी /सी. एल. वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये कोकण विभागासाठी काजू बोर्डाची स्थापना करण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले. पण या कोकण बोर्डच्या कार्य क्षेत्रातून गडहिंग्लज तालूका वगळण्यात आला आहे. गडहिंग्लज तालूक्याच्या या बोर्ड कार्यक्षेत्रात समावेश करण्यात यावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा भाजपा चे उपाध्यक्ष व माजी जि. प. सदस्य हेमंत कोलेकर यानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
    यासंदर्भातील निवेदन चंद्रकात दादा पाटील यांचेकडे सुपूर्द करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, काजू बोर्ड मध्ये सावंतवाडी सह चंदगड व आजऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. पण चंदगडला लागून असणाऱ्या गडहिंग्लज तालूक्यातही काजू वर प्रक्रिया करणारे उद्योग व काजू उत्पादक आहेत. शासनाने या उद्योगांना काजू उत्पादकाना काही मदत जाहिर केल्यास गडहिंग्लजचे शेतकरी यापासून वंचित राहण्याचा धोका आहे. त्यामूळे गडहिंग्लज तालूक्याचा समावेश या काजू बोर्ड मध्ये करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment