शेक्सपियर हे सार्वकालिक श्रेष्ठ साहित्यिक - प्रा. बळीराम सावंत, चंदगड महाविद्यालयात कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

27 April 2023

शेक्सपियर हे सार्वकालिक श्रेष्ठ साहित्यिक - प्रा. बळीराम सावंत, चंदगड महाविद्यालयात कार्यक्रम

 

प्रा. बळीराम सावंत मार्गदर्शन करताना.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         शेक्सपियर हे एक सर्जनशील साहित्यिक होता. तो इंग्लंडचा राष्ट्र कवी असला तरी त्याचे साहित्य जागतिक दर्जाचे आहे. त्याने लिहीलेल्या सुखात्मिका, शोकात्मिका, काव्य, सुनीते हे सारेच वाङमय त्याच्या प्रतिभेची  साक्ष देते. त्याचा जन्मदिवस हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. सुमारे २४०००  शब्दांची देणगी त्याने आपल्या वाङ्ममयातून दिली. तसेच पात्रांचे स्वभाव रेखाटन करताना तो त्यांची मानसिकता अत्यंत उत्तम रीतीने साकार करतो. इंग्रजी भाषेतील अन्य साहित्याबरोबरच शेक्सपियरच्या सर्वच वाड्मयीन कृतींचा अभ्यास केला पाहिजे .'असे प्रतिपादन प्रा. बळीराम सावंत यांनी केले. 

    ते येथील माडखोलकर महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना 'भाषेचा न्यूनगंड न बाळगता विद्यार्थ्यांनी नवनवीन शब्द शिकून घेतले पाहिजेत. प्रभुत्व मिळवले पाहिजे. मनातील भयगंड काढून टाकल्यास निश्चितच भाषेची आवड निर्माण होईल.' असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख एस. बी. दिवेकर यांनी केले. दिव्या फाटक हिने सूत्रसंचालन केले. चंद्रभागा गावडे हिने आभार मानले. डॉ. एन. के. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.  कार्यक्रमास आर. के. तेलगोटे, डॉ. डी. ए. मोरे व मायाप्पा पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment