तेऊरवाडी- कोवाड मार्गावरील मोऱ्या बांधकाम रखडले, वाहनधारक त्रस्त - चंदगड लाईव्ह न्युज

27 April 2023

तेऊरवाडी- कोवाड मार्गावरील मोऱ्या बांधकाम रखडले, वाहनधारक त्रस्त

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

          कोवाड ते तेऊरवाडी (ता. चंदगड) मार्गावर सुरू असलेल्या दोन मोऱ्यांचे काम गेल्या अनेक महिन्यापासून कुर्मगतीने सुरू आहे. परिणामी मार्गावरील वाहनधारक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  हे काम तात्काळ पूर्ण करून मुख्य रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा. अशी मागणी होत आहे.

        गडहिंग्लज (नेसरी ता. गडहिंग्लज) भागाला कोवाड, बेळगाव (कर्नाटक) परिसराशी जोडणारा हा महत्त्वाचा राज्य मार्ग असून यावर वाहनांची मोठी वर्दळ असते.  या मार्गावरील दोन मोऱ्यांचे सुरू असलेले बांधकाम पावसाळा जवळ आला तरी रडत खडत सुरू आहे. याचा त्रास वाहनधारक व प्रवासी वर्गाला होत आहे. कामासाठी काढलेला पर्यायी मार्ग धोकादायक असल्याने बरीच वाहने येथे बंद पडणे, लहान-मोठे अपघात नित्याचे बनले आहेत. संभाव्य मोठे धोके टाळण्यासाठी कामाची तात्काळ पूर्तता करावी अशी मागणी होत आहे.No comments:

Post a Comment