चंदगड तालुक्यामध्ये के. एल. इ. चे सुसज्ज हॉस्पिटल उभारणार- डॉ. प्रभाकर कोरे यांची माहिती, आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ डॉ. परशराम पाटील यांच्या प्रयत्नांना यश - चंदगड लाईव्ह न्युज

09 April 2023

चंदगड तालुक्यामध्ये के. एल. इ. चे सुसज्ज हॉस्पिटल उभारणार- डॉ. प्रभाकर कोरे यांची माहिती, आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ डॉ. परशराम पाटील यांच्या प्रयत्नांना यश

डॉ. प्रभाकर कोरे यांना हॉस्पिटलसाठी जागेबाबत चर्चा करताना डॉ.परशराम पाटील व इतर मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड तालुका हा निसर्ग संपन्न आहे. मात्र अनेक भौतिक सोयी- सुविधांपासून हा तालुका वंचित आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोग्याच्या बाबतीत या तालुक्यात अजूनही अध्ययावत सुविधा उपलब्ध नाहीत. तेव्हा कमी खर्चात व तात्काळ गरीब रुग्णांना आरोग्यसेवा मिळाव्यात व एक हि गरीब रुग्ण आरोग्यसेवेपासून वंचित राहू नये म्हणून चंदगड मध्ये के. एल. इ. चे हॉस्पिटल लवकर सुरू करण्याचा माणस डॉ. प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केला. ते हॉस्पिटलसाठी जागा पाहणी करण्यासाठी चंदगड तालुक्यात आले होते, त्यावेळी  बोलत होते.

पाटणे फाटा येथे जागेची पाहणी केल्यानंतर याबाबत चर्चा करताना डॉ. प्रभाकर कोरे, डॉ. परशराम पाटील व इतर मान्यवर.

          साधारणता एक वर्षांपूर्वी डॉ. परशराम पाटील यांनी डॉ. कोरे यांना चंदगडच्या आरोग्य विषयक समस्यांची सोडवणूक करावी अशी विनंती केली होती. तेव्हा तात्काळ याची दखल घेत त्यांनी चंदगड तालुक्यासाठी पाच जनसंपर्क अधिकाऱ्यांची (पी. आर. ओ.)  नेमणूक केली. दुसऱ्या टप्प्यात चंदगड मधील रुग्णांसाठी मोफत बस सेवा सुरू केली. आणि आता पाटणे फाटा येथे तात्काळ भाड्याने बिल्डिंग घेऊन हॉस्पिटल सुरू करण्याची प्रक्रिया सुरु केली.

      शिवाय लवकरच नवीन जागा खरेदी करून स्वतःच्या जागी हॉस्पिटल उभारणार व चंदगड तालुक्याच्या गोरगरीब रुग्णांना माफक दरात उत्तम आरोग्यसेवा देणार असल्याचे आश्वासन त्यांनी डॉ. पाटील यांना दिले. यावेळी त्यांच्यासोबत केलेली हॉस्पिटलचे संचालक, जे. एन. एम. सी च्या प्राचार्या, मुख्य इंजिनियर उपस्थित होते.

गुडेवाडी (ता. चंदगड) येथे डॉ. परशराम पाटील यांच्या घरी भेट दिली. त्यावेळी उपस्थित डॉ. प्रभाकर कोरे व इतर मान्यवर.

   जागेची पाहणी केल्यानंतर त्यांनी डॉ. पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी डॉ. पाटील यांनी डॉ. कोरे व के. एल. इ. प्रशासनाचे आभार मानले. यावेळी के. एल. ई. चे जनसंपर्क प्रमुख सुनील शिंदे, संदीप गावडे, रोहित पाटील, सुनील वायदंडे, तेजस सरशेट्टी, बयाप्पा पाटील, संपत पेडणेकर, सुनील आर्दाळकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment