कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
कुदनुर (ता. चंदगड) येथील मराठी विद्या मंदिर मध्ये रविवार दि. ७ मे रोजी झालेल्या मेळाव्यात ४८ वर्षानंतर १९७५ च्या इयत्ता सातवीचे वर्गमित्र एकत्र आले. रा. ल. आंबेवाडकर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली सदर मेळावा झाला. यावेळी मार्गदर्शक म्हणून आर. एच. मल्हारी व प्रा. एच. एस. नौकूडकर होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा व कै. के. बा. नागरदळेकर, कै. बी. के. गोडद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ४८ वर्ष दरम्यान पाच विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे निधन झाले, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी संस्काराच्या चांगल्या शिदोरीमुळेच आम्ही सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रात नाव कमावलो. यापैकी प्राध्यापक अधिकारी उद्योजक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगितले. यापुढेही आम्ही सर्वजण एकाच कुटुंबातील आहोत, अशा भावनेने राहू असे मनोगत माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. कन्या व कुमार विद्या मंदिर शाळेची गरज ओळखून शाळेला साऊंड सिस्टिम संच भेट म्हणून दिला. यावेळी मुख्याध्यापक शिक्षक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment