तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अडकूर ग्रामस्थ यांच्या वतीने मंगळवार दि. ९ रोजी अडकूर येथे खास महिलांसाठी अभिनेते मदन पलंगे यांचा खेळ खेळूया मानाच्या पैठाणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. रेवती अभय देसाई असणार आहेत.
खास महिलांसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमातील विजेत्या महिलाना बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमाचे उदघाटन सौ. सुस्मिता राजेश पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला प्रमूख पाहूणे म्हणून नेसरीच्या सरपंच सौ. गिरीजादेवी शिंदे, वेणू गोपाल गॅसच्या संचालिका सौ. शोभा वाटंगी, स्वराज्य गॅसच्या सौ. अश्विनी देसाई व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा सौ. संगिता पाटील उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन अडकूर ग्रामस्थांनी केले आहे.
No comments:
Post a Comment