माणगाव मधील नववधूच्या उखाण्याची जोरदार चर्चा, चंदगडी संस्कृतीचे जतन - चंदगड लाईव्ह न्युज

10 May 2023

माणगाव मधील नववधूच्या उखाण्याची जोरदार चर्चा, चंदगडी संस्कृतीचे जतन



तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा (एस. के. पाटील)

          लग्नसराई सुरू झाली की आठवण येते ती उखाण्यांची . उखाणा हा हिंदू धर्मात फार जिव्हाळ्याचा विषय. माणगावमधील एका नववधूने उतिशय सुंदर अशा शद्बात स्वतः शब्द बद्ध केलेला आणि माहेर व सासरचे गुणगाण करणारा उखाणा घेऊन सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला.

       अप्रत्यक्षपणे व्यक्तिचे नाव घेण्याकरीता किंवा अप्रत्यक्ष पणे एखादी वस्तू, घटना सूचविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काव्यमय पंक्तीना उखाणा असे म्हणतात. हा मराठी संस्कृतितिल एक वैशिट्य पूर्ण काव्य प्रकार आहे. पारंपारिक कौटुंबिक व्यवस्थेत पत्नीने पतीचे नाव चारचौघात उच्चारणे आजही चंदगड तालूक्यात टाळले जाते. तालूक्यात लग्न, सत्यनारायण पूजा' इतर धार्मिक कार्यामध्ये उखाणा घेऊन आपल्या पत्नीचे अगर पतिचे नाव घ्यावयाची विनंती केली जाते. पण अशा अचानक वेळी नाव घ्यायला लावले तर दोघांचीही भांबेरी उडते. पण सध्या चंदगड तालूक्यातील माणगावमधील तनुश्री बेनके हिचा विवाह येथीलच शाहू फडके या युवकाशी झाला. यावेळी या  एम. एस्सी झालेल्या तनुश्री ने घेतलेल्या  उखाण्याच व्हीडीओ खूपच व्हायरल झाला - विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात सकाळी साखरपूडा, दुपारी हळदी आणि सायंकाळी विवाह सोहळा आटपण्याच्या काळातही चंदगडमध्ये चंदगडी संस्कृती उखाण्यांच्या माध्यमातून जपली जात आहे हे या उखाण्यातून स्पष्ट होते.

No comments:

Post a Comment