पहिल्याच वळवाने आणली चंदगड-हेरे रस्त्यावर माती, गटारीचा प्रश्न ऐरणीवर - चंदगड लाईव्ह न्युज

10 May 2023

पहिल्याच वळवाने आणली चंदगड-हेरे रस्त्यावर माती, गटारीचा प्रश्न ऐरणीवर

 

चंदगड हेरे मार्गावर पहिल्याच पावसात गटारे नसल्याने  माती रस्त्यावर येऊन अपघात घडत आहेत. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

     सोमवार व मंगळवारी झालेल्या वळवाच्या मुसळधार पावसात चंदगड तालुक्याला चाांगलाच दणका दिला.या वर्षांत पडलेल्या पहिल्याच  पावसाने चंदगड-हेरे या नवीन केलेल्या रस्त्यावर माती वाहून आल्याने रस्त्यामध्ये माती साचून वाहतुक थांबली होती. तर वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागली. त्यामुळे गटारीचा प्रश्न ऐरणीवर आला असून पावसाळ्यापूर्वी गटारी व साईड पट्टया होणे गरजेचे आहे. 

       मुसळधार पाऊस पडल्यामुळे गटारांअभावी माती रस्त्यावर वाहून आली. त्यामुळे वाहनधारकांना याचा अंदाज न आल्याने घसरण होऊन अपघात झाले. साईट पट्टींवर टाकलेली लाल मातीही पावसाने वाहून गेली आहे.तर काही ठिकाणी रस्त्यावर घसरण झाली आहे. सध्या परिस्थितीत अजून पावसाला सुरुवात झाली नाही.हीच परिस्थिती पावसाळ्यात जीवावर बेतू शकते. वेळोवेळी येथील नागरिकांनी गटारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर गटारी व्हावी म्हणून मागणी केली आहे. आमदार राजेश पाटील व माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून गटारी पावसा अगोदर पूर्ण करण्यासंदर्भात अधिसूचना दिल्या आहेत. पण या पावसाळ्यापूर्वी गटारी होणे अशक्यप्राय वाटत आहे. हेरे बाजारपेठेतील  रस्त्याची उंची मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे पाण्याचे तळे साचून अनेकांच्या घरी व दुकानात पाणी  शिरले. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा पावसाळ्या अगोदर गटारे गरजेची आहेत. 

No comments:

Post a Comment