शिक्षण क्षेत्र हे स्फटिका सारखे स्वच्छ पारदर्शक करा - बी.डी. पाटील, मजरे कार्वे येथे प्रबोधन शिबिर संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

10 May 2023

शिक्षण क्षेत्र हे स्फटिका सारखे स्वच्छ पारदर्शक करा - बी.डी. पाटील, मजरे कार्वे येथे प्रबोधन शिबिर संपन्न

प्रबोधन शिबिर व सत्कार सोहळ्यात बोलताना बी डी पाटील व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        ज्या शाळेत आपण काम करतो ती माझी शाळा आहे आणि या शाळेत येणाऱ्या मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी माझं काम आहे अशी भावना मनात ठेवून सेवा केल्यास या देशाचे भविष्य उज्वल होण्यास जास्त वेळ लागणार नाही. प्रत्येकाने स्पटिका सारखे काम करून शिक्षण क्षेत्र स्वच्छ करण्याचे काम करा असे प्रतिपादन शिक्षक संघटना फेडरेशनचे राज्य समन्वयक बी.डी.पाटील यांनी केले. चंदगड तालुक्यातील मजरे कार्वे येथील प्रबोधन शिबिर व सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एम. एम. गावडे हे होते.

      तालुकाध्यक्ष सुभाष बेळगावकर यांनी प्रास्ताविक केल्यानंतर आर. डी. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी बोलताना बी. डी. पाटील म्हणाले ``कोणा एका व्यक्तीवर आलेले संकट हे सामुदायिक संकट म्हणून त्याकडे बघितले पाहिजेत. यासाठी संघटित होऊन काम करणे गरजेचे आहे. संघटनेने कामांची पूर्तता होते व शासन दरबारी आवाज पोहोचवला जातो. नोकरी करत असताना कोणाची लाचारी पत्करू नका. तुमच्या हातून घडणारी पिढी या देशाचे भवितव्य घडवेल यासाठी तुम्ही तुमच्यातील शिक्षक जागा करा व हे शिक्षण क्षेत्र स्फटिका सारखे स्वच्छ करा अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांनी शिक्षक महासंघाच्या वतीने शासन दरबारी वेळोवेळी शालेय निकषांची परिपुर्तता करून सर्वसमावेशक आणि सर्वांच्या हिताच्या दृष्टीने शासन दरबारी निर्णय घेण्यास शासनाला भाग पडले.  संघटना चळवळ एकजुटी ही खूप महत्त्वाची असून संघटनेने कोणा एकाचा विजय होत नसून तर तो सर्व संघटनेचा विजय होत असतो. यासाठी संघटित राहून काम करणे गरजेचे असे मत यावेळी व्यक्त केले.``

      यावेळी चौकशी समिती व न्याय पद्धती यावर जिल्हा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष बी. एल. नाईक यांचे व्याख्यान,  काळाची आव्हाने व शिक्षक संघटना यावर कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बी एस खामकर, देय रजा व रजेचा प्रकार यावरती कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव सुरेश खोत यांची व्याख्याने झाली. तर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल  ॲड. बी. डी. मनोळकर, ॲड. डी. एन. पाटील, गणेश निळ, ए. एस. पाटील, रविंद्र देसाई, दीपा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एम. एम. तुपारे, गणेश नीळ, दिपा पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. 

       कार्यक्रमाचे अध्यक्ष  एम. एम. गावडे म्हणाले भेदभाव न करता संघटना पूर्ण क्षमतेने चालली पाहिजेत. एकीची ताकद खूप महत्त्वाची असल्याने आपण संघटित राहून आपला हेतू साध्य करून घेण्यास आज संघटना प्रबळ असणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. यावेळी एस. डी. पाटील, संजय तुपारे, बी. बी. नाईक, ई. एल. पाटील, एस. आर. पाटील, जी. पी. वरपे, पी. व्ही. ढेरे, राजू भोगण, प्रकाश बोकडे, नाना निर्मळकर, व्ही. बी. व्हन्याळकर, आर. एस. बोरगावकर, गुलाब पाटील, महादेव भोगुलकर, पांडूरंग मोहनगेकर, अजित गणाचारी, आण्णापा चिंचणगी, कुंदन पाटील व कोल्हापूर जिल्हयातील सर्व तालूक्यातील संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. अनिल पाटील यानी सुत्रसंचालन केले तर आभार पी. एम. ओऊळकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment