अधिकाऱ्यांनी नागरिकांची कामे विनाविलंब करावीत - आम. राजेश पाटील, हेरे महसूल विभाग महाराजस्व अभियान अंतर्गत शासन आपल्या दारी - चंदगड लाईव्ह न्युज

11 May 2023

अधिकाऱ्यांनी नागरिकांची कामे विनाविलंब करावीत - आम. राजेश पाटील, हेरे महसूल विभाग महाराजस्व अभियान अंतर्गत शासन आपल्या दारी



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
     शासनाच्या विविध योजना या सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. तहसील कार्यालय व इतर शासन दरबारी सर्वसामान्यांची होरपळ होत आहे, चिरीमिरीसाठी नागरिकांची कामे करण्यात अधिकाऱ्यांकडून कुचराई केली जात आहे. अधिकाऱ्यांनी ही आपले काम चोख करण्याची गरज आहे. सर्वसामान्य शेतकरी वर्गाला समजून घेऊन योजनांची पूर्तता करावी. शासनाचे काम आणि दिवसभर थांब असला हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम आम. राजेश पाटील यांनी दिला. हेरे (ता. चंदगड)  येथे महसूल विभाग महाराष्ट्र अभियान अंतर्गत शासन आपल्या दारी २०२३ या कार्यक्रम प्रसंगी  ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे  होते.
        प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक नायब तहसीलदार अशोक पाटील यांनी केले. आम. पाटील पुढे म्हणाले, चंदगडच्या जनतेचा अंत पाहू नका. संयमी असलेली चंदगडची जनता अंगावर आली की शिंगावर घेऊ शकते. या प्रकारची  अनेक उदाहरणे असून शासन दरबारी त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी अधिकारी वर्गावर आहे. हेरे सरंजाम चा प्रश्न बरीच प्रलंबित आहे.जमीन कसणारा शेतकरी जमीन दोन वर्ग ची जमीन एक नंबरची व्हावी. अशी वेळोवेळी मागणी करूनही तो प्रश्न प्रलंबित राहत आहे. शेतकरी हे वंचित आहेत. शासकीय अधिकारी हे आपले मायबाप आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा अंत पाहू नका. आपल्या हातातील कामे कशी मार्गी लागतील हे पाहणे सध्या गरजेचे आहे. याचा न्याय निवाडा होण्याची गरज आहे. वन्यप्राणी व इतर प्रश्नही सोडवण्याची गरज आहे. असे मत आमदार राजेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. 
    माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील यांनीही यावेळी तहसील कार्यालयातील अपुरी कामे पूर्ण करून घेण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी प्रांताधिकारी श्री. वाघमोडे यांनी हेरे सरंजाम प्रश्नी एकदिवसीय कार्यक्रम घेऊन सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्राचार्य यू. एल. पवार, माजी उपसरपंच आप्पाजी गावडे, जयवंत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली. गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, वनक्षषेत्रपा प्रशांत आळवे, नंदकुमार भोसले, तलाठी श्रीमती पाटील, सरपंच जयश्री गावडे, उपसरपंच विशाल बल्लाळ, माजी सरपंच पंकज तेलंग, रणजीत सावंत भोसले, अंकुश गावडे, चंद्रकांत पाटकर, महादेव प्रसादे, निंगु  पाटील, गुरु गावडे  यांसह वन, महसूल, खात्यातील कर्मचारी  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. डी. कांबळे यांनी केले. आभार मंंडल अधिकारी अरुण शेट्टी यांनी मानले.

 हेरे सरंजामचा प्रलंबित प्रश्न सुटावा यासाठी वेळोवेळी पाठपुरवठा केला तरीसुद्धा हा  प्रश्न प्रलंबितच आहे. केवळ पोस्टरबाजी करून प्रश्न सुटत नाहीत. हा प्रश्न १५ ऑगस्ट पर्यंत नाही सुटल्यास स्वतः मला आंदोलन करून उपोषणाला बसणार असा इशाराही आमदार पाटील यांनी यावेळी दिला.


No comments:

Post a Comment