तिलारी घाटात गोवा बनावटीची दारू जप्त, २ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, चंदगड पोलीसांची कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

15 May 2023

तिलारी घाटात गोवा बनावटीची दारू जप्त, २ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, चंदगड पोलीसांची कारवाई


चंदगड / प्रतिनिधी 
तिलारी घाटात  गोव्याहून आंध्रप्रदेशात जाणारी गोवा बनावटीची ८७ हजार २५० रूपयांच्या दारू सह वहातूकीसाठी वापरलेली गाडी असा एकूण २ लाख ६५ हजार ५० रूपयांचा मुद्देमालजप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चालक राचमल्लू रविचंद्रा रेड्डी (वय ३९ वर्षे, रा. कासानुरू, जि.काडाप्पा, आंध्रप्रदेश) यास अटक केली  आहे. ही कारवाई काल (रविवार दि. १४ मे रोजी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दोडामार्ग ते चंदगड मार्गावर तिलारी घाटाच्या वरती करण्यात आली आहे. तिलारी घाटात सायंकाळच्या सुमारास एक कार (फोर्डची फिएस्टा KA 51 MC 4813) गोव्यावरून येत होती. दरम्यान,तिलारी घाटात गाडीची तपासणी केली असता त्या गाडीत गोवा बनावटीची दारु अवैधरित्या वाहतुक करीत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी चालक राचमल्लू रविचंद्रा रेड्डी याला अटक केली असून गोवा बनावटीच्या ८७ हजार २५० रूपयांची  विविध कंपन्यांचे दारूचे बॉक्स आणि १८० हजारांची चारचाकी असा एकूण २ लाख ६५ हजार ५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास पोसई  हणमंत नाईक करत आहेत.
No comments:

Post a Comment