सुसंस्कृतपणा अंगी रुजवून धैर्यशील बना - संजय पाटील, तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना निरोप - चंदगड लाईव्ह न्युज

15 May 2023

सुसंस्कृतपणा अंगी रुजवून धैर्यशील बना - संजय पाटील, तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना निरोप

 


चंदगड / प्रतिनिधी
शिक्षक , प्राध्यापक, शास्त्रज्ञ , पत्रकार , उद्योजक बनण्याचा प्रयत्न करा. अनेक क्षेत्रामध्ये आपण करियर बनवू शकतो. सुखदुःखाला सामोरे जाण्यासाठी धैर्यशील बना. ज्ञान, वाचन , संस्कृती,  समाज, सुसंस्कृतपणा अशा गोष्टी अंगी बानवा. कितीही मोठे व्हा पण आई-वडिल आणि कुटुंबाला विसरू नका.' असे प्रतिपादन दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यानी केले. ते  हलकर्णी (ता. चंदगड) येथील  यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील तृतीय वर्ष विद्यार्थी निरोप समारंभात बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी.डी.अजळकर  होते. यावेळी व्यासपीठावर नॅक समन्वयक डॉ . राजेश घोरपडे प्रा . के एम गोनुगडे डॉ चंद्रकांत पोतदार माधुरी सुतार उपस्थित होते. 
          प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ चंद्रकांत पोतदार यांनी केले. उपस्थितांचे स्वागत डॉ . ए .व्ही .पाटील, प्रा . जी . पी . कांबळे , प्रा . व्ही .व्ही . कोलकार आदींनी केले. प्राचार्य डॉ . बी डी अजळकर यानी, 'आयुष्याला कलाटणी पदवीनंतर मिळत असते .पदवीनंतर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाची सुरुवात होत असते .मनगटात ताकद निर्माण करून यशाला गवसणी घाला . आई वडील हे आपले प्रेरणास्त्रोत असतात त्यांना विसरू नका .प्रत्येक गोष्टीची सांगड चांगली घाला म्हणजे आयुष्य घडेल.असे सांगितले.
 अनेक विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कु गडकरी ,रणजीत होनगेकर , महेश सांबद्रेकर, माधुरी सुतार आदी  विद्यार्थ्यांनी आपले अनुभव यावेळी सादर केले. प्रा एन एन गावडे, डॉ. राजेश घोरपडे, प्रा. के. एम . गोनुगडे व आदी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
                   यावेळी माजी नॅक समन्वयक डॉ. आय. आर . जरळी, प्रा ए एस बागवान, डॉ. अनिल गवळी,  प्रा ए एस जाधव, डॉ जे जे व्हटकर, प्रा जी जे गावडे, प्रा . एस डी तावदारे, प्रा एस एन खरुजकर, प्रा एम एन पाटील, प्रा व्ही डी पाटील, प्रा एस एन पाटील, आदी प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, बी.ए ,बी कॉम, बी एस्सी भाग तीनचे विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या. इंद्रायणी पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. यु एस पाटील यांनी आभार मानले.



No comments:

Post a Comment