गडहिंग्लज बसस्थानकामध्थे सापडलेले मंगळसुत्र विवाहितेला परत, दाटे येथील शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा - चंदगड लाईव्ह न्युज

16 May 2023

गडहिंग्लज बसस्थानकामध्थे सापडलेले मंगळसुत्र विवाहितेला परत, दाटे येथील शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा


चंदगड /प्रतिनिधी (नंदकुमार ढेरे)
     गडहिंग्लज येथील मध्यवर्ती बस स्थानकात सापडलेले अडीच तोळ्याचे मंगळसुत्र दाटे (ता. चंदगड) येथील महादेव मारुती मोरे या शेतकऱ्याने प्रामाणिकपणे अनिता गावडे (रा. न्हावेली, ता. चंदगड) या विवाहितेला परत देऊन समाजात अजुनही प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे दाखवून दिले. 
    काल कामानिमित्त महादेव मोरे हे गडहिंग्लजला गेले होते. काम आवरुन चंदगड येण्यासाठी गडहिंग्लज बसस्थानकात मोरे हे चंदगड कोल्हापूर गाडीची वाट पहात होते. त्या अगोदरच अनिता गावडे ही विवाहिता ही चंदगडला येण्यासाठी बसस्थानकात चंदगड गाडीची वाट पहात होती. याच दरम्यान सौ. गावडे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हुकातील गाठ सैल झाल्याने खाली जमिनीवर पडले. मंगळसुत्र जमिनीवर पडल्याची जराही शंका गावडे यांना आली नाही. त्या बसण्यासाठी स्थानकातील बाकड्याकडे आल्या. यावेळी जमिनीवर पडलेल्या मंगळसुत्रकडे महादेव मोरे यांचे लक्ष गेले. लागलीच त्यांनी ते पडलेले मंगळसुत्र उचलून घेतले व याबाबत उपस्थितीत महिलांमध्ये चौकशी केली. यावेळी कोणत्याही महीलेने मंगळसुत्र आपले असल्याचे सांगितले नाही. अखेर मोरे यांनी मंगळसुत्र घेऊन आगार प्रमुखाकडे जाऊन हरवलेले मंगळसुत्र जमा केले. आगार प्रमुख यांनी याबाबत स्पीकरवरून मंगळसुत्र हरवल्याची घोषणा केली. त्यावेळी उपस्थित महिलामधून सौ. गावडे यानी पुढे होत मंगळसुत्र आपले असल्याचे सांगितले. खात्री पटल्यानंतर अनिता गावडे या  विवाहितेल विवाहितेला तीचे मंगळसुत्र परत करण्यात आले. प्रामाणिकपणा बद्दल सौ. गावडे यांनी मोरे यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले.



No comments:

Post a Comment