कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथील सेवानिवृत्त कॅप्टन धोंडीराम नारायण नागरदळेकर (वय- ६४) यांचे दि ११ रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर आज दि. १२ मे २०२३ रोजी कुदनूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ८ वर्षांपूर्वी ते भारतीय सैन्यातून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. केडीसीसी बँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर अर्जुन नागरदळेकर यांचे ते भाऊ होत. रक्षाविसर्जन सोमवार १५ रोजी आहे.
No comments:
Post a Comment