कडलगे येथे वरातीत विनापरवाना लावलेली डाल्बी जप्त, नवरदेव, वरपिता व वधुपित्यासह १४ जणावर गुन्हा दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

12 May 2023

कडलगे येथे वरातीत विनापरवाना लावलेली डाल्बी जप्त, नवरदेव, वरपिता व वधुपित्यासह १४ जणावर गुन्हा दाखल

 

संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

कडलगे खुर्द (ता. चंदगड) येथे लग्नाच्या वरातीच्या विनापरवाना डाल्बी लावून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वैजनाथ अशोक पाटील (रा. सुंडी, ता. चंदगड) या नवरेदेवासह १४ जणांवर चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  काल दि.११मे रोजी वैजनाथ पाटील यांचा विवाह कडलगे (ता. चंदगड) चंदगड येथील प्रणाली या वधु बरोबर झाल्या नंतर लग्नाच्या वरातीत नंदराज शिवाजी पाटील (रा. हडलगे) यांच्या मालकीची डाॅल्बी साऊंड सिस्टीम, लायटींग ट्रॅक्टर वर मोठ्या आवाजात लावून ध्वनिप्रदूषण सूरू होते. या वरातीत काही तरूण बेभान होऊन नाचत होते.दहा ते ७० डेसिबल पेक्षाही जास्त आवाजाची क्षमता असल्याने मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत होते याबाबत चंदगड पोलिस ठाण्याचे अंमलदार अमोल देवकुळे यानी डाॅल्बी परवान्या बाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे परवाना नव्हता, त्यामुळे डाल्बी बंद करण्यास सांगूनही त्यांनी  डाल्बी बंद केली नाही.त्यामुळे परशराम मारुती बिर्जे (वधुपिता) रा. कडलगे खुर्द, अशोक मारूती पाटील (वरपिता), सागर राजेंद्र पाटील, क्षितिज शाम मुतकेकर, विठ्ठल येरूळकर, नरसू आंबेवाडकर, तानाजी येरूळकर, अंकुश पाटील( सर्व रा.कडलगे खुर्द ता.चंदगड)आदित्य रमेश पाटील,शरद पांडुरंग पाटील (दोघेही रा. कडलगे खुर्द)ओमकार सुरेश पाटील (ऑपरेटर, रा. महागाव ता.गडहिंग्लज) यासह १४जणावर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हयातील डाॅल्बी साऊंड सिस्टीम २,ट्रॅक्टर, ट्राॅली,जनरेटर आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.या बाबत पोलीस पाटील राजेंद्र पाटील यानी चंदगड पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास पोहेकाॅ महेश बांबळे करत आहेत.

No comments:

Post a Comment