गुरु शिष्य मेळावा प्रसंगी श्री सिद्धेश्वर हायस्कूल कुदनूर येथे उपस्थित तत्कालीन शिक्षक व विद्यार्थी |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथील श्री सिद्धेश्वर हायस्कूलच्या इयत्ता दहावी बॅच २००२ च्या विद्यार्थ्यांचा गुरु- शिष्य मेळावा नुकताच संपन्न झाला. २१ वर्षानंतर एकत्र येत वर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षकांनी परिसरात वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक एम वाय पाटील हे होते. सुरुवातीस विद्यार्थ्यांना त्या काळात ज्ञानाचे धडे दिलेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
यात मुख्याध्यापक एम वाय पाटील, शशिकांत कोरी, दळवी, पी जी नागेनट्टी, वर्गशिक्षक ए टी खनगुतकर, के जी पाटील, आर आर कांबळे, आय के स्वामी, ओऊळकर, तानाजी कांबळे, नाना निर्मळकर, आर व्ही देसाई, टी एल तेरणीकर आदींचा समावेश होता.
तर शिक्षकेतर कर्मचारी संतोष चौगुले अजित दंडगलकर, नारायण मामा, पवार मामा, यळेमण्णी मामा, परसू रेडेकर आदींचा हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी मनोगतातून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
No comments:
Post a Comment