अडकूर आरोग्य केंद्राचा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते स्वीकारताना वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ व आरोग्य केंद्रातील कर्मचारी |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने दिनांक 7 एप्रिल ते 14 एप्रिल 2023 च्या दरम्यान सुंदर माझा दवाखाना ही मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये सर्वोत्कृष्ट आरोग्य केंद्र म्हणून चंदगड तालूक्यातील अडकूर ला पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले. हा पुरस्कार अडकूर प्रा. आ. केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी स्विकारला. तर तालूका स्तरावर पाटणे आरोग्य उपकेंद्राला उत्कृष्ठ पुरस्काराने गौरवण्यात आले.
या मोहिमेमध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यातील 75 आरोग्य केंद्रापैकी तीन प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली. या मोहिमेमध्ये सर्वोत्कृष्ट काम करणारे प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर तालुका शिरोळ २) प्राथमिक आरोग्य केंद्र अडकूर तालुका चंदगड ३) प्राथमिक आरोग्य केंद्र वडणगे तालुका करवीर या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या तपासणी करून निवड करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील 413 आरोग्य उपकेंद्रापैकी बारा आरोग्य उपकेंद्राची सर्वोत्कृष्ट म्हणून या मोहिमेमध्ये निवड करण्यात आली. त्या अंतर्गत चंदगड तालुक्यामधून पाटणे आरोग्य उपकेंद्राची सर्वोत्कृष्ट आरोग्य उपकेंद्र म्हणून निवड करण्यात आली.
एक मे 2023 महाराष्ट्र दिन शाहू मैदान कोल्हापूर येथे आयोजित समारंभमध्ये सर्वोत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचे जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
No comments:
Post a Comment